सुनील भंडारे पाटील
मुळशी पॅटर्नचे लोन पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी, जिल्ह्याच्या
बऱ्याचशा भागात टोळी ( गॅंग वार ) युद्ध,पोलिसांनी पोलिसी खाक्या
दाखवन्याची गरज, मुलांवर चांगले संस्कार होण्याची गरज,
जिल्ह्यामध्ये तरुणाई सद्यस्थितीत शॉर्ट कट च्या मार्गाने
पैसे कमविणे कडे तरुण मुले युवक यांचा खूपच ओघ वाढला आहे, त्यामध्ये लँड
माफिया, वाळू माफिया, औद्योगिक क्षेत्रामध्ये हप्ते वसुली, लेबर
कॉन्ट्रॅक्ट, स्क्रॅप आदी व्यवसायाकडे तरुण युवक आकर्षित होत आहेत, जलद
मार्गाने कमी कालावधीत जास्तीत जास्त पैसा कमवण्याची ही साधने असल्याने एका
तरुणांमुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे, या घातक गोष्टीचा आदर्श
तरुणांमध्ये तयार होत आहे, काळाच्या ओघात जसे दोन वाघ एका जंगलात राहू शकत
नाही तसे दोन संबंधित व्यवसायिक एका एरियात राहू शकत नाही, परिणामतः
नेतृत्व करण्यासाठी एकाने तयार केलेली तरुणांची लॉबी, व दुसऱ्यांनी तयार
केलेली तरुणांची लॉबी यांच्यामध्ये वरील व्यवसाय मधील आर्थिक व्यवहारावरून
संघर्ष तयार होऊन त्याचे खूप मोठे परिवर्तन टोळी युद्धात होते, गॅंगवार
मधून पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुनाच्या बदल्यातं खून अशा घटना वारंवार
घडत आहेत, जिल्ह्यामधील पुणे शहर, पिंपरी चिंचवड, चाकण, सणसवाडी,रांजणगाव
औद्योगिक वसाहती, त्याचप्रमाणे राहू, लोणीकंद अशा ठिकाणी टोळी युद्धा मधून
वाईट घटना घडल्या आहेत, हे भविष्याच्या दृष्टिकोनातून तरुणाईसाठी घातक आहे,
कायद्याची माहिती सर्वांना असताना अशा घटना वारंवार का घडतात, तरुणांमध्ये
नेतृत्व करण्यासाठी संबंधित व्यवसाय वर प्रभुत्व ठेवण्यासाठी
युगपुरुषांच्या नावे ग्रुप स्थापन करून तरुणांना एकत्रित करणे, व ह्या
ताकदीच्या जोरावर स्वतःची पोळी भाजून घेणे याकडे तरुणाई वळण घेत आहे,
चांगल्या भवितव्यासाठी हे कुठेतरी थांबले पाहिजे,
*****
तरुण पिढीला वाईट मार्गाला जाऊन न देता चांगल्या व्यवसायाकडे वळवणे,
चांगल्या हूद्याचे पदाधिकारी बनवण्यासाठी आई-वडिलांच्या संस्कारांची खूपच
गरज आहे, बऱ्याचदा संस्कारांचा अभाव,वाईट संगत यामुळे तरुण मुले वाईट
मार्गाच्या दिशेने वाटचाल करतात, गुन्हेगारी मधील तरुणांचे वय पाहिले तर
ते साधारणता 20 ते 30 च्या दरम्यान आहे, म्हणजे कमवण्याचे जीवन सुरुवात
नेमका याच वेळी तरुणांचा पाय घसरतो, आई-वडिलांच्या कष्टाची माती होते,
संपूर्ण कुटुंबाचा नाश अशा अनेक ज्वलंत घटना आहेत ****