हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
पुणे: विमल नर्सिंग होम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि आयसीयू सेंटर यांच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन 28/06/22 रोजी व २८/०६/२२ते २८/०७/२२ या रोजी सवलतीच्या दरात शस्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती डायरेक्टर डॉक्टर गजानन शिंदे यांनी दिली. यावेळी डायरेक्टर डॉक्टर पल्लवी शिंदे उपस्थित होत्या. पुढे माहिती देताना डॉक्टर शिंदे म्हणाले की सदर शिबिर विमल नर्सिंग होम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि आयसीयु सेंटर शंकर महाराज चौक (अहिल्यादेवी चौक) शेवंता हाइट्स पुणे सातारा रोड बालाजी नगर धनकवडी पुणे या ठिकाणी होणार असून सदर शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच मोफत रक्तातील साखर तपासणी ईसीजी रक्तदाब तपासणे करण्यात येणार आहेत. शिबिरामध्ये हर्निया हायड्रोसिल अपेंडिक्स दुर्बिणीतून अपेंडिक्स मुळव्याध भगंदर फिशर एमटी पिडी आणि शिडी आणि गर्भाशय साफ करणे, नॉर्मल डिलिव्हरी सिजेरियन सेक्शन ओपन हिस्ट्रेक्टॉमी, दुर्बिणीतून हिस्ट्रेक्टॉमी, , दुर्बिणीतून टुयबेकट्युमी अशा प्रकारच्या विविध शस्त्रक्रिया अत्यंत सवलतीच्या दरात करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.शिंदे यांनी दिली.