वाघोलीत शिवसैनिक आक्रमक

Bharari News
0
हवेली तालुका विशेष प्रतिनिधी
               वाघोलीत शिवसैनिक आक्रमक;बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी,शिंदेंच्या पुतळ्याचे जोडे मारीत दहन संजय सातव पाटील,युवराज दळवी,विशाल सातव यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर निषेध            
 शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वेठीस धरले आहे.या शिवसेनेच्या आमदारांना एकत्रित करून शिवसेनेचे खच्चीकरण करणारे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे,आदी बंडखोर आमदार यांच्या विरोधात उपनगर वाघोली(ता.हवेली) येथे शिवसेनेच्या वतीने तसेच शिवसेना अंगीकृत संघटना पुणे जिल्हा वाहतूक सेना,युवा सेना यांच्या वतीने बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी,शिंदेंच्या पुतळ्याचे जोडे मारीत दहन करीत जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी,शिवसैनिक आक्रमक झाले होते.
   
 वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख युवराज दळवी,शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख संजय सातव पाटील,वाहतूक सेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र तांबे,युवा सेनेचे राज्य सहसचिव विशाल सातव पाटील,माजी हवेली तालुका प्रमुख राजेंद्र पायगुडे यांच्या अधिपत्याखाली व मार्गदर्शनाखाली पुणे-नगर महामार्गावर शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या निषेधाची सुरुवात झाली.यावेळी वाघोलीतील शिवसैनिक संजय सातव पाटील,युवराज दळवी,राजेंद्र पायगुडे,विशाल सातव पाटील,दत्तात्रय बेंडावले,राजेंद्र तांबे,किशोर पाटोळे,अंकुश कोतवाल,प्रवीण कांबळे,रवी काळे,सुरेश सातव,शंकर संगम, ज्ञानेश्वर पोळ,राहुल शेंडगे,कांताराम सातव,ओमकार तुपे,प्रकाश लोले,माऊली शिवले,इतर शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

[शिवसेना संस्थापक हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करीत आपल्या पिताश्रींचा वारसा जपत शिवसेना पक्षवाढीसाठी आदर्शवत काम करीत आहे.त्यांच्या बरोबर आमच्यासह पुणे जिल्ह्यातील शिवसैनिक आहे.शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो.
*-संजय सातव पाटील,माजी उपजिल्हा प्रमुख-पुणे तथा सदस्य-पु.जि.नियोजन समिती]*

[पुणे जिल्हा वाहतूक सेना मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या बरोबर कायम असून उद्धव ठाकरेंच्याच मार्गदर्शनाखाली काम करीत आहोत.बंडखोरी केलेल्या आमदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो.या बंडखोरांनी चुकीच्या पद्धतीने पाऊल उचलले असल्याने त्यांना हा निर्णय धोक्याचा ठरला असून त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे.
*-युवराज दळवी,जिल्हाप्रमुख-पु.जिल्हा वाहतूक सेना]*

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!