*राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त
समता शिक्षण संस्थेचा उपक्रम*
शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथे समता शिक्षण संस्थेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त समता दिन साजरा करण्यात आला. तळेगाव ढमढेरे येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे
पूजन करून अभिवादन करताना समता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा उषा वाघ व
उपस्थित मान्यवर.(छाया : नमीरा डिजीटल)
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील आनंदाश्रम प्राथमिक शाळा व समता वसतिगृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा प्रा. उषा वाघ होत्या. या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त शाहू, फुले, आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समता शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सेवानिवृत्ती निमित्त प्राचार्य जालिंदर अडसूळ यांचा सन्मान करण्यात आला. तळेगाव
ढमढेरे येथे समता दिन कार्यक्रमात समता शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी
वर्षानिमित्त पुस्तिकेचे प्रकाशन करताना मान्यवर.(छाया : नमीरा डिजीटल)
यावेळी पुणे महानगरपालिकेचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी संजय मोरे, समता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा उषा वाघ, उपाध्यक्ष मधुकर शिंदे, सचिव जालिंदर अडसुळे, सदस्य ॲड.संपत कांबळे, ॲड.प्रतिभा गवळी, सुनील कामत, प्रा. डॉ. निशा भंडारे, डॉ.चंद्रकांत केदारी, प्रा. एन.बी. मुल्ला, प्रविण जगताप, प्रसाद दीक्षित, रचना अडसुळे, मंगल कांबळे, गौरी शिंदे, बुधा बिऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना उषा वाघ यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली. शाहू, फुले, आंबेडकर यांची समतेची विचारधारा युवकांनी अवलंबावी असे आवाहनही याप्रसंगी वाघ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आनंदाश्रम प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक वाडिले, विजय भोर, केशव पवार, संदीप गोसावी, शंकर शिंदे, सुनीता शेरखाने, वसतिगृह अधीक्षक शंकर मुनोळी, विजया अहिरे, शशिकला खेडेकर, बालाजी बोरकर, दिलीप गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.संपत कांबळे यांनी केले. संदीप गोसावी व ॲड.प्रतिभा गवळी यांनी सूत्रसंचालन केले तर केशव पवार यांनी आभार मानले.