सुनिल भंडारे पाटील
आईच्या मृत्यूची घटना सहन न झाल्याने अंत्यविधी तच मुलाने सोडले प्राण, पेरणे (ता हवेली) येथील घटना,
रविवार ता 12 रोजी रात्री 8 वाजता पेरणे येथील कृष्णाबाई हनुमंत वाळके( वय 92) या मातोश्री अनंतात विलीन झाल्या, आज सोमवार ता 13 रोजी सकाळी 10 वाजता पेरणे स्मशानभूमी येथे अंत्यविधी दरम्यान कृष्णाबाई यांचा मुलगा शिवाजी( अण्णा) हनुमंत वाळके ( वय 67) यांना आपल्या आईचा मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने त्यांनी अचानक अंत्यविधीच्या ठिकाणी प्राण सोडले, या घटनेमुळे माय लेका मधील प्रेम,जिव्हाळा, पुन्हा एकदा सिद्ध झाला, या घटनेची माहिती पंचक्रोशी समजतात लोकांनी हळहळ व्यक्त केली, शिवाजी वाळके यांनी पेरणे सरपंच, उपसरपंच, पेरणे बकोरी दिंडीचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते,त्यांना गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी कार्यकर्ते पुरस्कार मिळाला होता त्यांचे बंधू बबनराव हनुमंत वाळके दिंडीचे विणेकरी होत, गावामध्ये राजकारण, समाजसेवा यावर त्यांची वाघासारखी छाप होती, त्यांच्या जाण्याने भावकी व गावावर शोककळा पसरली आहे,