रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
मंत्री म्हणून न पोलीस संरक्षणा ची गरज, न गाड्या घेऊन फिरण्याची हौस, न मीडिया समोरचा दिखाऊपणा, जे पोटात तेच ओठात,
मंत्री
म्हणून सरकारने दिलेल्या घरात देखील रुग्णाची सोय करणारा हा माणूस केवळ
सत्ता व पैश्या च्या मागे
कधीच धावला नाही, कायम धावला तो रुग्णसेवे मागे
म्हणून भाऊंना जनतेने भरभरून 4 वेळा आमदार केले, भाऊंनी कधीच जातीचे
राजकारण केले नाही, कधी धर्माचे, कधी पैशाचे, न कधी आमदारकीचे तिकीट मिळावे
म्हणून मुंबई दिल्लीतील नेत्यांचे पाय धरले, भाऊंनी सेवा केली ती
शेतकऱ्यांची, या मतदारराजा निवडणुकीतील 2 आमदार निवडून दिले व 2 कार्यकर्ते
कमी मतांनी आमदार होता राहिले,अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष बापुसाहेब नवले यांनी दिली
निवडणुकी
नंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बदलली , फडवणीस, ठाकरे, पवार
सर्वजण बच्चूभाऊंचा पाठिंबा घेण्यासाठी त्यांच्या मागे आले, बच्चूभाऊ यांनी
मतदार संघ विकासासाठी व जनतेची सेवा करण्यासाठी ठाकरे सरकार मध्ये
मंत्रीपद स्वीकारले, त्या मुळे जे लोक म्हणत आहेत भाऊ कसे गेले गुवाहाटी ला
त्यांनी समजून घ्यावे बच्चूभाऊ हे फडणवीस, ठाकरे, पवार यांच्या राजकारणाला
बांधील नाहीत किंवा त्यांच्या जीवावर आमदार होत नाहीत, बच्चूभाऊ केवळ व
केवळ जनतेची सेवा करून आमदार होत आहेत व प्रहार महाराष्ट्र भर वाढवत आहेत,
त्या मुळे भाऊ केवळ उत्तरदायी आहेत महाराष्ट्राच्या मतदारांचे, विविध
राजकीय पक्षाच्या दावणीला बांधून घेतलेले कार्यकर्त्यांनी हे समजून घ्यावे
मग बच्चूभाऊ वर टीका करावी, बच्चूभाऊ देखील या टीकेला भीक घालत नाहीत, या
टीकेला पुरून उरून बच्चूभाऊ महाराष्ट्रात एक दिवस दिल्ली-मुंबई मधील
नेत्यांचे नाही तर गावकुसातील शेतकऱ्यांचे राज्य महाराष्ट्रात आणतील हे
नक्की, ही सुरवात आहे, पिक्चर अभी बाकी है....