सुनील भंडारे पाटील
अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढू बुद्रुक (ता शिरूर) दैनंदिन नित्य पूजेचा मान आज रविवार ता 19 रोजी पत्रकारांना देण्यात आला,
*श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान* शिरूर तालुका पुणे जिल्हा यांच्या वतीने समाधीस्थळावर गेल्या 18 ते 20 वर्षापासून दैनंदिन नित्य पूजेचे आयोजन करत आहे, राज्याच्या विविध भागातून सकाळी 6 वाजता वेगवेगळ्या ठिकाणाहून शंभू भक्त येत असतात, समाधी स्थळाची स्वच्छता करून आकर्षक फुलांची सजावट, हार फुले, ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र, सूर्यहृदयमंत्र, उच्चारले जातात, आज सर्व पत्रकार मित्रांच्या वतीने पूजा करण्यात आली, यावेळी शरद आनंदराव पाबळे, सुनील बाळासाहेब भांडवलकर, काळूराम दिनकर गव्हाणे, प्रवीण कुमार बबनराव जगताप, जालिंदर केरबा आदक, नूरमोहम्मद बाबु मुल्ला, उदयकांत देविदास ब्राह्मणे, श्रीहरी बबनराव पऱ्हाड, शेरखान सिकंदर शेख, हेमंत दिलीप चापोडे, विठ्ठल बबन वळशे व मोठ्या संख्येने शिरूर हवेली तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते,