मोराची चिंचोलीचे पाणीसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Bharari News
0

रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 

                चिंचोली मोराची गावाला चासकमान किंवा डिंभा कालव्याचे  पाणी मिळण्याबाबत राज्यशासन,आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांना चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आली आहेत. त्याच बरोबर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने २० जुन रोजी सकाळी ९ वाजता चिंचोली येथून खंडोबा चे जागरण गोंधळ करून  शिरुर तहसिल कार्यालयावर पाणी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
            

शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची हे गाव शासना ने क दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.कित्येक वर्षापासून चिंचोली गावात शेतीसाठी पाणी, पिण्यास पाणी या समस्या आहे. शेतकऱ्यांना  शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहवे लागते.चिंचोलीच्या जवळच्या परिसरात अवघ्या काही अंतरावर दोन्ही बाजुला कालव्याचे पाणी जाऊन सुध्दा चिंचोली गावला त्याचा फायदा होत नाही. चिंचोली गावाला पावसाळा सोडला तर शेतीला काय पिण्यास ही पाणी नसते. गावात  पहिल्या पासुन मोर आहे.घरातल्या मुलांना जपावे तसे गावकरी मोराची काळजी घेतात.पण अन्न, पाणी नसल्यामुळे काही मोर स्थलांतरित झाले आहे.पुढील काळात अशीच परिस्थिती राहिल्यावर मोरासोबत आम्हालाही पाणी विना स्थलांतरित व्हावे लागेल. 
             

  त्यामुळे चिंचोलीकर ग्रामस्थांची   शासना ला विनंती आहे की आमच्या गावाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर चासकमान किंवा डिंभा चारीचे पाणी आमच्या  गावाला द्यावे.पाणी ची समस्या ही गंभीर आहे.या  समस्यांचे निवारण न झाल्यास पुढील काळात आम्ही आंदोलन व  उपोषण करुन .आमच्या शासना कडे मागण्या मंजुर करण्यासाठी प्रयत्नशील राहू.
                                     मागण्या पुढीलप्रमाणे 
१)  मुख्य मागणी  चासकमान किंवा डिंभा चारीचे पाणी आमच्या गावाला द्यावे 
२)  चिंचोली मोराची पर्यटन स्थळ मध्ये मोरांची काळजी, देखभाल करण्यासाठी समिती स्थापन करावी.
३) मोराना जगवण्यसाठी ग्रामपंचायतला निधी उपलब्ध करुन द्यावा.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!