Pune Bike Thief : पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या । पुण्यातून दुचाकी चोरुन नगरमध्ये विकायचे..

Bharari News
0

 जुन्नर : पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरून अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात अत्यंत कमी किमतीत विकणाऱ्या चौघा दुचाकीचोरांना आळेफाटा पोलिसांनी गजाआड (Arrest) केले आहे. त्यांनी एक, दोन नव्हे तर तब्बल 45 मोटारसायकल (Bikes) चोरल्याची कबुली तपासात दिली आहे. त्याच्याकडून सुमारे 23 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे. आळेफाटा पोलिसांची मोटारसायकल चोरी प्रकरणातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. प्रमोद लक्ष्मण सुरकुटे (26), ज्ञानेश्वर रंगनाथ कुरेशी (22), गणेश फक्कड कारखिले (23), आदिल मुख्तार कुरेशी (21) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपींची नावे आहे.



मंगळसूत्र चोरीच्या घटनेत एकाला अटक केल्यानंतर दुचाकी चोरीची घटना उघड

उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा पोलीस ठाणे हद्दीमधील गुंजाळवाडी येथून 29 मे रोजी शांताबाई बबन पावडे यांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र जबरदस्तीने ओढून अनोळखी इसमाने धूम ठोकली होती. त्यानुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी तपास पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी बेल्हे, गुंजाळवाडी, राजुरी भागातील सीसीटीव्ही व तांत्रिक माहितीचा आधार घेतला. अनोळखी इसम प्रमोद लक्ष्मण सुरकुंडे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याने मणीमंगळसूत्र चोरल्याची कबुलीही दिली. पोलिसांनी चोरी केलेला सोन्याचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला.

पुण्यात विविध ठिकाणी बाईक चोरीचे गुन्हे दाखल

दरम्यान आरोपीवर 2021 मध्ये अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाणे येथे वाहन चोरीचा एक गुन्हा दाखल असल्याने त्या अनुषंगाने त्याच्याकडे सखोल चौकशी केली. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ज्ञानेश्वर रंगनाथ बिबवे, गणेश फक्कड कारखिले, आदिल मुख्तार अहमद कुरेशी यांच्या मदतीने पुणे ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या आळेफाटा येथील 1, नारायणगाव 1, ओतूर 1, शिरूर 4, शिक्रापूर 1, रांजणगाव एमआयडीसी 3, पुणे शहर अंतर्गत येणाऱ्या चंदननगर 3, बंडगार्डन 1, फारसखाणा 2, येरवडा 1, लोणीकंद 3, पिंपरी चिंचवड अंतर्गत चिखली 1, चाकण 3, अहमदनगर अंतर्गत पारनेर 2, कोतवाली 2, शिर्डी 1, नाशिक ग्रामीण अंतर्गत दिंडोरी 1, हिंगोली ग्रामीण अंतर्गत हिंगोली ग्रामीण 1, नवी मुंबई अंतर्गत रबाळे 1, औरंगाबाद ग्रामीण अंतर्गत एमआयडीसी 1 दुचाकी चोरल्याचे सांगितले. संबंधित पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!