वाघोली, खराडी पाणी पुरवठा योजना आणि भूमिगत ड्रेनेजसाठी 110 कोंटीचा निधी

Bharari News
0


सुनील भंडारे पाटील 
           वाघोली, खराडी (ता हवेली) पाणी पुरवठा योजना आणि भूमिगत ड्रेनेजसाठी 110 कोंटीचा निधी,जि.प.सदस्य ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांच्या पाठपुराव्याला यश,आयुक्‍त विक्रम कुमार यांच्या विशेष बैठकीत निर्णय,पुणे महापलिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या वाघोली तसेच खराडीसाठी पाणी पुरवठा तसेच भूमिगत ड्रेनेजलाइन योजनेसाठी तब्बल 110 कोटींचा निधी महापालिकेकडून उपलब्ध करून दिला  तसेच जुलै महिन्याअखेरीस सदर काम सुरू करण्यात यावे, अशी सूचना आयुक्‍त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी केली आहे.                
जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्‍वर कटके यांची या प्रश्‍नी आज पालिकेत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. याबाबत जि.प.सदस्य ज्ञानेश्‍वर कटके यांनी सांगितले की, पुणे महानगरपालिकेत वाघोली आणि खराडीचा काही भाग समाविष्ट करण्यात आल्यानंतर या भागातील पाणी टंचाईचा प्रश्‍न कायमचा सुटेल येथील ड्रेनेजलाइनचे काम तातडीने होईल यासह अन्य मूलभूत प्रश्‍न सुटतील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु, त्यानंतरच्या राजकीय घडमोडीत महापालिकेवर प्रशासकांची नेमणूक झाल्याने या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष झाले. अखेर, नागरिकांकडून होणारी मागणी तसेच वाढत्या तक्रारी याची दखल घेत याप्रश्‍नी आयुक्‍तांशी आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 
           
मुळात वाघोली पाणी पुरवठा योजनेसाठी गेल्या काही वर्षांपासून शासकीय पातळीवर प्रयत्न करीत आहे. यामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना, भामाआसखेड प्रकल्पाचे पाणी, वाघोलीसाठी वढु बुद्रुक बंधाऱ्यातून नळ पाणीपुरवठा योजनेसाठी "पीएमआरडीए'कडे पाठपुरावा अशा विविध पातळीवर प्रयत्न सुरू होते. त्यातच वाघोली आणि खराडीचा समावेश महापलिकेत झाल्यानंतर पालिकेकडून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविली जावी, यासाठी पाठपुरावा करीत होतो. त्याअनुषंगाने आज आयुक्‍तांशी झालेल्या बैठकीत ड्रेनेजलाइन कामासाठीही निधीची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यानुसार आयुक्‍त विक्रम कुमार यांनी 110 कोटींची तरतुद केली आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात या कामांना सुरूवात होणार असल्याचेही ज्ञानेश्‍वर कटके यांनी सांगितले. याबद्दल कटके यांनी आयुक्‍तांचे नागरिकांच्यावतीने आभार ही मानले,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!