अनिकेत मुळीक लोणी काळभोर
लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, राजेश
लोखंडे, दिनकर लोखंडे, विनायक रामाने,मनोज खरपुडे, गणेश लोखंडे ,शिवाजी
जाधव ,अमोल सरतापे कार्यक्षेत्रातील लोणी काळभोर व हडपसर पोलिस स्टेशन
हद्दीत पेट्रोलिंग करत असताना *सहाय्यक पोलीस फौजदार उदय काळभोर** यांना
त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पुणे सोलापूर रोड 15 नंबर चौक
हडपसर पुणे जवळ येथे एक इसम थांबला असून त्यांचेकडे नंबर प्लेट नसलेली टू
व्हीलर गाडी आहे त्याप्रमाणे सदरची बातमी पो नि सुनील पंधरकर यांना
कळविली असता त्यांनी कायदेशीर कारवाई संदर्भात आदेश दिले. त्याप्रमाणे
वरील स्टाफच्या मदतीने बातमीच्या ठिकाणी जाऊन बातमीतील वर्णनाच्या इसमाला
जागीच ताब्यात घेऊन सदर इसमास नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव *संतोष
विठ्ठल भोळे वय 25 वर्ष रा. काळुबाई नगर वाघोली पुणे * असे असल्याचे
सांगितले. त्याचे कडे मिळून आलेल्या कीं रु 20000/- ची हिरो स्प्लेंडर गाडी
न mh/12/HK/ 6166 बाबत विचारपूस करता त्याने सदरची गाडी मयूर व तो स्वतः
उरुळी कांचन पुणे येथून चोरल्याचे सांगितल्याने सदर गाडी बाबत खात्री करता_
*लोणी काळभोर पो स्टे गु र नं 53 /2021भा द वि कलम 379* प्रमाणे गुन्हा
दाखल असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी लोणी काळभोर
पोलीस ठाणे चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची
कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त श्री
संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त
गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री. नारायण
शिरगांवकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांचे मार्गदर्शनाखाली स पो
नि विवेक पाडवी, स पो फौ उदय काळभोर, पोलीस अंमलदार राजेश लोखंडे, दिनकर
लोखंडे, विनायक रामाने, मनोज खरपुडे, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव,अमोल सरतापे
यांनी केलेली आहे.