रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
गणेगाव खालसा येथील वनविभागाच्या हद्दीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून प्लॅस्टिकचा कचरा जाळण्याचे काम अज्ञात व्यक्तीकडून केले जात असून याकडे ग्रामपंचायत प्रशासन व वन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
गणेगाव खालसा व वाघाळे या दोन गावांच्या हद्दीमध्ये वनविभागाचे मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्र आहे. या वनविभागाच्या जागेत कचरा डेपो करण्यावरून १० वर्षांपुर्वी मोठे वादंग निर्माण झाले होते. मात्र याच वनविभागाच्या हद्दीमध्ये आता काही अज्ञात व्यक्तींकडून प्लास्टिकचा कचरा जाळण्याचे काम जोमात सुरु आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे उपसरपंच अभिजित तांबे यांच्याशी संपर्क साधला असता सदर प्रकारा बाबत आपणास काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन संबंधितांना त्या ठिकाणी कचरा टाकण्यास मज्जाव करणार असल्याचे
सांगितले.