सुधारीत आश्वासित प्रगती योजना शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
                  राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे तीन लाभांकीत सेवांतर्गत सुधारीत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याची मागणी शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आमदार नागो गाणार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.       
आमदार नागो गाणार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या १०, २० व ३० वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभाची सुधारीत आश्वासीत प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र ही योजना अद्याप लागू केलेली नाही. खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्याची शिफारस अभ्यास गटाच्या दि.६ मार्च २०२० रोजी अंतीम बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार अभ्यासगटाचा अंतीम अहवाल दि. ८ मे २०२० च्या पत्राद्वारे शासनास शिफारस करण्यात आली आहे. यापूर्वी देखील अनेकवेळा निवेदनाद्वारे ही योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु अद्यापही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. त्यामुळे खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सदर लाभापासून अजूनही वंचित आहेत. तरी तातडीने ही योजना लागू करण्याचा निर्णय घेऊन शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणीही आमदार गाणार यांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!