प्रतिनिधी मिलिंद टेमकर
आंबेगाव (मंचर)ग्रामीण मानव विकास संस्था
संस्थापक अध्यक्ष संतोष साळवे यांच्या संकल्पनेतून मंचर तालुका आंबेगाव येथे आदिवासी पारधी समाजाच्या वस्तीवर सन 2022 पासून आदिवासी निवासी शाळा ही पारधी समाजाच्या मुलांसाठी लोकवर्गणीतून उभी करण्याचे विचार अमलात आणायचं आहे,
आदिवासी समाज सतत भटकती करणारा उघड्यावर जीवन जगणारा असा हा आमचा पारधी समाज जर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आला तर निश्चितच जीवनात फार परिवर्तन करून दाखवेल अशी अपेक्षा आम्हाला आहे यासाठी लहान लहान मुलांना पहिलीपासूनच मराठी किंवा इंग्लिश चे शिक्षण मिळले तर जीवनात खूप मोठा बदल करू शकतात व जगाच्या स्पर्धेत देखील उतरू शकतो
त्याकरता मंगेश भोसले यांनी तर समाजाच्या हितासाठी स्वतःला वाहूनच घेतलेले आहे भोसले स्वतः समाजाच्या विकासासाठी पंधरा ते वीस वर्षे पासून सतत झटत आहे व समाजाला नवीन जीवनदान मिळावे व माणूस म्हणून जगण्याची उमेद निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न देखील करत आहे, आदिवासी निवासी शाळा पहिलीपासून सुरू करण्याचा मनोसोबा आहे या साठी लोकवर्गणीतूनच सहकार्य होईल,