घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार....

Bharari News
0
मांडवगण फराटा एकनाथ थोरात
          शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असलेल्या घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे . या निवडणुकीसाठी एकूण 132 अर्ज वैध झाले आहेत . गेल्या दोन वर्षापासून कोटोनामुळे निवडणुक लांबणीवर पडली होती . या वर्षी होत असलेली निवडणूक दोन्ही बाजूने ताकत लावल्याने रंगतदार होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .
    घोडगंगा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण 19 हजार 351 सभासद आहेत . घोडगंगा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण 6 गट असून त्यात न्हावरे , शिरूर ग्रामीण , तळेगाव ढमढेरे , मांडवगण फराटा , वडगाव रासाई , इनामगाव या गटाचा समावेश होतो . यापैकी तळेगाव ढमढेरे हा गट सर्वात मोठा असून या गटात 3576 मतदार सभासद आहेत . त्यापाठोपाठ शिरूर - 3498 सभासद , न्हावरे - 3331 सभासद , वडगांव रासाई - 3244 सभासद , इनामगांव 3147 सभासद , मांडवगण फराटा 2555 सभासद तर ' ब ' वर्ग मतदार यादी 22 सभासद असे एकूण 19 हजार 351 मतदान सभासद आहेत .
या निवडणुकीत अनेक प्रस्थापित पुढाऱ्यांनी निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केले आहेत . या अर्जाची छाननी पार पडली असून यात काका साहेब खळदकर व अन्य तीन उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत . या निवडणुकीसाठी अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख 18 जुलै असून कोणत्या गटात कोण माघार घेणार यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे . आताच्या निवडणुकीत मांडवगण फराटा गटातून 14 अर्ज , तळेगाव ढमढेरे 24 , न्हावरे 15 , वडगाव रासाई 12 , इनामगाव 11 , शिरुर 13 अर्ज वैध झाले आहेत . संस्था ब गट 2 अर्ज , अनुसूचित जाती जमाती - 4 , महिला प्रतिनिधी 16 , भटक्या विमुक्त जाती जमाती 11 , इतर मागास प्रवर्ग 10 अर्ज असे एकूण 132 अर्ज या निवडणुकीसाठी वैध ठरले आहेत
  
  या निवडणुकीसाठी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल असून दुसऱ्या बाजूने भाजप , काँग्रेस , शिवसेना , मनसे व इतर सर्वपक्षीय मिळून घोडगंगा किसान क्रांती या पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत . याअगोदर माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात होती . परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादा पाटील फराटे सुधीर फराटे , काका खळदकर , ॲड सुरेश पलांडे , महेश ढमढेरे , आबासाहेब गव्हाणे , अरविंद ढमढेरे , आबासाहेब सोनवणे , राजेंद्र कोरेकर , राहुल पाचर्णे यांनी घोडगंगा किसान क्रांती पॅनलची या निवडणुकीत मोट बांधली आहे . त्यामुळे सत्ताधारी गटाला ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी जाणार नसल्याचे बोलले जात आहे .
     एका बाजूने सर्व तालुक्यातील नेते आमदार अशोक पवार यांच्या विरोधात एकवटलेले असताना आमदार पवार हे मात्र या निवडणुकीत तरुणांना संधी देणार असल्याचे बोलले जात आहे . त्यामुळे या निवडणुकीत ज्येष्ठ विरुद्ध तरुण असा सामना पहायला मिळाल्यास नवल वाटायला नको . निवडणुकीला सुरवात झाल्यापासून घोडगंगा किसान क्रांती पॅनल कडून सातत्याने कारखान्याच्या कारभारावर विरोधकांकडून हल्लाबोल केला जात आहे . त्यामुळे या निवडणुकीत मतदार नेमके सत्ताधारी गटाला कौल देणार की सत्तापालट करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
     दोन्ही बाजूने जोरदार तयारी सुरु असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार हे मात्र नक्की . यावर्षी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी दोन्ही बाजूने जोरदार फिल्डिग लावल्याचे पाहायला मिळत आहे . 18 जुलै रोजी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून नक्की उमेदवाराची माळ कुणाच्या गळ्यात पडते आणि कुणाच्या पदरी निराशा येते हे पाहणे औमुक्याचे ठरणार आहे . त्याचबरोबर या निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालेल्याचा गट कोणत्या गटात सामील होऊन निवडणुकीला सामोरे जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
             तळेगाव ढमढेरे गटातून सुरेश पलांडे , महेश ढमढेरे , मधुकर दोरगे , अरविंद ढमढेरे , विश्वास कोहकडे , आबासाहेब गव्हाणे , राहुल गवारी , संदीप गुंदेचा , प्रकाश पवार या दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत . तर शिरूर गटातून माजी आमदार बाबुराव पाचर्णे , राजेंद्र जगदाळे , राजेंद्र गावडे , पांडुरंग थोरात , सवित्रा थोरात यांनी अर्ज दाखल केले आहेत . मांडवगण फराटा गटातून दादा पाटील फराटे , संभाजी फराटे , बाळासाहेब फराटे , सोनवणे भाऊसाहेब , शंकर फराटे , अरुण नागवडे यांनी अर्ज दाखल केले आहेत .
              इनामगाव गटातून नरेंद्र माने , सचिन मचाले , तुकाराम निंबाळकर , सुदाम शिंदे , तात्या घाडगे यांनी अर्ज दाखल केले . न्हावरे गटातून भाऊसाहेब भोसले , शरद निंबाळकर , सागर निंबाळकर , अशोक संकपाळ , संजय काळे , पांडुरंग दुर्गे या दिग्गज उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.वडगाव रासाई गटातून आमदार अशोक पवार , सुजाता पवार , उमेश साठे , ठकसेन ढवळे , वीरेंद्र शेलार , शरद साठे , प्रशांत होळकर , कमलाकर साठे , सुभाष शेलार , ऋषिराज पवार , सुरेश ढवळे , सुभाष शेलार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . महिला प्रवर्गातून सुजाता पवार , सीमा फटाटे , प्रतिभा बोत्रे , सुवर्णा फराटे , लतिका वराळे , छाया फराटे , उज्वला शेलार , यमुना वाळुंज , मंगल कोंडे यांनी अर्ज दाखल केले आहेत .

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!