मंचर येथे उजव्या कालव्यात पडली पुणे येथील मारुती गाडी

Bharari News
0
आंबेगाव  प्रमिला टेमगिरे
भीमाशंकर येथून दर्शन घेऊन येत असलेल्या कोथरूड पुणे येथील भाविकांची मारुती गाडी हुतात्मा बाबू गेनू जलाशयात [डिंभाजलाशय ] येथे उजव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात पडल्याची घटना मंचर [ ता आंबेगाव ] येथे दि  ९ /७/२०२२  रोजी रात्रीच्या सुमारास घडली घटनेची माहिती काळातच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस व मोराडे फूडस कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत केल्यामुळे तिघांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे,
भीमाशंकर येथे दर्शन घेऊन मंचरच्या दिशेने पश्चिम दिशेला असलेल्या उजव्या कालव्यालगत असलेल्या रस्त्यावरून मारुती गाडी [ एम एच १२ ए झेड १६३५ ] यातून तिघेजण पुण्याकडे जात असताना पावसाचा जोर वाढल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी पाण्याने भरलेल्या कालव्यात गेली
गाडीत असलेल्यांपैकी महेश पाठक [वय ४१ ] शोभा महेश पाठक  रा भागीरथी टॉवर कोथरूड पुणे 
पुष्पा महावीर दुबे [वय ७६ ]खंडोबा मध्य प्रदेश  हे गाडीत होते दुर्घटनेची माहिती मिळताच जवळच असलेल्या मोराडे फूड्स कंपनीतील कर्मचारी व मंचर पोलीस ठाण्यातील पोलीस हा तानाजी हगवणे  
पो ज योगेश रोडे यांनी पाण्यात उतरून तिघांनाही सुखरूप बाहेर काढले त्यामुळे मोठी दुर्घटना 
टळलीआहे क्रेनच्या साहाय्याने गाडी पाण्यातून बाहेर काढण्यात आली असून सर्वांची प्रकृती ठीक आहे,

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!