सुनील भंडारे पाटील
वढू बुद्रुक (तालुका शिरूर ) येथील अखंड हिंदुस्तानचे आरोग्य दैवत धर्मवीर, छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळावर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने दैनंदिन पूजा केली जाते,
रोज सकाळी पहाटे 6:00 वाजता समाधी परिसर स्वच्छता, समाधी स्वच्छता, हार फुले, अष्टगंध, अगरबत्ती, महापूजा, त्यानंतर शंभू वंदना, शंखनाद असे पूजेचे स्वरूप आहे, दैनंदिन उपक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यातील रोज वेगवेगळ्या गावांमधील शंभू भक्त समाधीस्थळी येऊन पूजेचा मान मिळवतात, गेल्या अनेक वर्षांपासून हा दिनक्रम अखंडित आहे, दैनंदिन पूजा, रोजच्या गावांचा मान हे सर्व नियोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने केले जाते,
बाहेरील राज्यातून देखील शंभू भक्त पूजेसाठी येत असतात, शिवाय परदेशी नागरिकांकडून देखील पूजा करण्यासाठी मागणी होत आहे, परंतु यावर विचार चालू असून अद्याप परवानगी दिली नाही असे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने सांगण्यात आले,