शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
शिरूर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांचे व सोळा पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडत काढून जाहीर करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा परिषद येथे आज गुरूवार दि. (२८ जुलै) रोजी जिल्हा परिषद गटांचे व पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख व जि. प.चे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. शिरूर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण पुढीलप्रमाणे :- टाकळी हाजी -कवठे यमाई (नागरिकांचा मागास प्रवर्ग - ओबीसी), शिरूर ग्रामीण -निमोणे (अनुसूचित जमाती राखीव), कारेगाव -रांजणगाव गणपती (सर्वसाधारण), करंदी -कान्हुरमेसाई ( सर्वसाधारण), सणसवाडी-कोरेगाव भीमा (सर्वसाधारण महिला), तळेगाव ढमढेरे - शिक्रापूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग- ओबीसी), न्हावरा -निमगांव म्हाळुंगी (सर्वसाधारण),
वडगांव रासाई - मांडवगण फराटा (अनुसूचित जमाती राखीव). शिरुर पंचायत समिती गनाचे आरक्षण पुढीलप्रमाणे :- टाकळी हाजी (सर्वसाधारण), कवठे यमाई (सर्वसाधारण महिला), शिरूर ग्रामीण (सर्वसाधारण महिला), निमोणे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), कारेगाव (सर्वसाधारण महिला), रांजणगाव गणपती (सर्वसाधारण महिला), करंदी (अनुसूचित जमाती महिला), कान्हुरमेसाई (नागरिकांचा मागास प्रवर्ग - ओबीसी), सणसवाडी (सर्वसाधारण), कोरेगाव भीमा (अनुसूचित जाती), तळेगाव ढमढेरे (सर्वसाधारण), शिक्रापूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग - ओबीसी), न्हावरा (सर्वसाधारण), निमगाव म्हाळुंगी (सर्वसाधारण), वडगाव रासाई (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), मांडवगण फराटा (सर्वसाधारण महिला).