लोणी काळभोर अनिकेत मुळीक
मोठ्या अक्षरांमध्ये लोणी काळभोर बस स्थानकावर *स्वच्छ बस स्थानक असे लिहिले आहे.* पण स्वच्छता कुठे आहे.. आपली रोजची सर्वसामान्यांची नोकरीची सुरुवात व शाळा,कॉलेज जाण्या येण्यासाठी बस स्थानकाचा वापर होतो. पण बस स्थानकच जर अस्वच्छ (घाणेरडे) असेल तर प्रवासी नागरिकांनी थांबायचे कुठे..?
मुळात फक्त बस येण्यासाठी बस स्थानक नसून ते प्रवाशांचे हक्काचे निवाऱ्याचे स्थान आहे. जर तेच अस्वच्छ असेल (घाणेरडे)असेल तर प्रवासी नागरिकांनी थांबायचे कुठे.?
असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले आहेत. रात्रीच्या वेळी तर खूप भयावह अवस्था आहे एक तर अस्वच्छ बस स्थानक (बस स्टॉप) वर बियरच्या, दारूच्या बाटल्या थुंकलेला गुटखा, रात्री लाईट सुद्धा नाही. महिला ही कामावरून रात्री सुटताना किंवा रात्रपाळी (नाईट शीप)साठी कामावर येतात जातात तेव्हा **बस स्थानकावर लाईट नाही.* *रात्रीची वेळ अशा परिस्थितीमध्ये जर काही दुष्कर्म झाले तर जबाबदार कोण.?*
**प्रशासना कडे सामान्य लोकांची मागणी..*
१) बस स्थानक हे स्वच्छ असावे रोज..
२) तेथे लाईट लॅम्प असावा
३) रात्रीची वेळ असल्याने सीसीटीव्ही कॅमेरा असावा. काही गोष्टींचा अनर्थ टळेल. चोऱ्या लुटमार महिला प्रवासी नागरिकांना सुरक्षितता ही वाटेल..*
प्रशासनाने तत्काळ या गोष्टी कडे लक्ष्य घालावे....