आंबेगाव प्रमिला टेमगिरे
अवसरी खुर्द:( तालुका आंबेगाव,)रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवनाथ विद्यालय , तांत्रिक व किमान कौशल्य विद्यालय येथे रोटरी क्लब ऑफ मंचर च्या माध्यमातून विध्यार्थीनी साठी `अस्मिता ' हे सुरक्षा व आरोग्यविषयक 100 पुस्तिका विद्यालयाच्या वाचनालायमध्ये मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या ..
मंचर रोटरी क्लब चे मा. अध्यक्ष व विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे सदस्य प्रशांत अभंग यांच्या 50 व्या वर्षात पदार्पणानिमित्त वाढदिवसाचे औचित्य साधून ह्या पुस्तिका विद्यालयाच्या वाचनालय मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ...प्रसंगी स्थानिक शाळा समिती सदस्य तथा पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे सरचिटणीस शरदराव शिंदे , शाळा समितीचे सदस्य कल्याणराव टेमकर , पर्यवेक्षक सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी ,विध्यार्थी -विध्यार्थी नी उपस्थित होते ...यावेळी प्रशांत अभंग यांचा प्रचार्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . शरदराव शिंदे ,कल्याणराव टेमकर यांची यावेळी भाषणे झाली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डी डी जाधव होते ...कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश गुरव सर यांनी केले ..