लोणी काळभोर सचिन सुंबे
पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर स्टेशन येथे एमआयटी कॉर्नर जवळ गेल्या चार दिवसापासून बंद पडलेल्या एका अवजड वाहनामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे
पुणे सोलापूर महामार्गावर बेसिस्त वाहन चालकांचा सुळसुळाट झाला असून दुचाकी, चार चाकी, मालवाहतूक लहान मोठ्या व कंटेनर गाड्या बेफाम धावत आहेत, त्यामुळे लहान मोठे अपघात देखील संबंधित महामार्गावर झाले आहेत या बेशिस्त वाहन चालकांना पोलीस प्रशासनाने शिस्त लावण्याची गरज आहे, आता हेच पहाना छायाचित्रात दिसणारा ट्रॉली ट्रक लोखंडी कॉइल, हा ट्रक गेल्या चार दिवसापासून त्या ठिकाणी उभा आहे नेमके काय कारण हे देखील कोण शोधत नाही, हा ट्रक अशा ठिकाणी उभा आहे की ज्या ठिकाणी वाहनांची सतत वर्दळ असते, लोकांची दाट गर्दी असते, या ट्रकमुळे वाहतुकीची कोंडी होत असून, रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.या वाहनाकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून त्वरित हे अवजड वाहन हटवावे अशी नागरिकांनी मागणी केली आहे.