सुनील भंडारे पाटील
धर्मपीठ, शक्तिपीठ, बलिदानपीठ, श्रीक्षेत्र वडू बुद्रुक (ता शिरूर) येथे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी महिलाचे संघटन होऊन, महिन्यातून एकदा सभा घेतली जाते, आज गावामधील आश्रय सोसायटीमध्ये महिंद् गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सभा घेण्यात आली,
देशामध्ये, राज्यामध्ये दुसरी पंढरी समजल्या जाणाऱ्या, धाकलं धनी समाधी स्थळावर धर्माचे कार्य करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महिला शक्ती सरसावली असून, महिला संघटनेचे कार्य जोर धरू लागले आहे, जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी महिला शक्ती जागृत झाली आहे, इतिहास साक्षी आहे, महिला रणरागिनी शक्तीने वाईटाचा सर्वनाश केला आहे, महिलांचे कार्य श्रेष्ठ आहे, समाधी स्थळ विकास,, जनजागृती, समाधी स्थळाचा इतिहास अखंड हिंदुस्तानामध्ये प्रसार करण्यासाठी आता महिला सरसावल्या आहेत, यावेळी हिंदूप्रेमी, मार्गदर्शक, शिवनेरी ते पंढरपूर पायी छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा आयोजक संदीप महिंद गुरुजी यांनी मार्गदर्शन केले, याप्रसंगी भिमाबाई भंडारे, वनारशी अवचरे, जया मुंडे, गीतांजली जगताप, पोर्णिमा लांजेकर, मनीषा साबळे, प्रतीक्षा भंडारे, आशा देशमुख, स्नेहा शिवले,अंजली देशमुख, सुजाता भंडारे, उर्मिला भंडारे, सविता मयेकर, विद्या पाटील, समृद्धी भंडारे, मंजुळा बनसोडे , व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या,