सुनील भंडारे पाटील
शिक्रापूर (ता शिरूर) येथे युवासेना पदाधिकारी आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे मा. पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री, युवासेना प्रमुख मा. आदित्यजी ठाकरेसाहेब यांच्या आदेशानुसार, युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना राज्यविस्तारक मा.निलेशजी बडदे यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये युवासेना शिरुर तालुका पदाधिकारी आढावा बैठकीचे आयोजन आज त्रिमुर्ती मंगल कार्यालय, शिक्रापुर येथे करण्यात आले होते.
यावेळी युवासेनेच्या संघटना बांधणी चा आढावा युवासेना राज्यविस्तारक निलेशजी बडदे तसेच युवासेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र भाऊ सातव यांनी घेतला. तळागाळात जाऊन संघटना बांधणीचे काम सर्व पदाधिकाऱ्यांनी करावे असा कानमंत्र यावेळी दिला. राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा, हिंदु मध्ये फुट पाडण्याचे वक्तव्य, मराठी माणसांचा कायम अपमान करणार्या राज्यपालांचा निषेद नोंदवुन राज्यपालांना केंद्रसरकार ने परत बोलावुन घ्यावे या साठी युवासेना शिरुर तालुक्याच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. युवासेना राज्यविस्तारक निलेशजी बडदे, युवासेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र भाऊ सातव,विजय लोखंडे युवासेना तालुकाप्रमुख, सुनिलभाऊ जाधव युवासेना शहरप्रमुख शिरुर, स्वप्नील रेड्डी (उपशहरप्रमुख),संतोष ढमढेरे वरीष्ठ शिवसैनिक , गोकुळ ढमढेरे ( उपतालुका प्रमुख,युवासेना ) ,नाना गिलबिले (उपविभाग प्रमुख शिवसेना) , विकास जासुद (सोशल मिडीया), आकाश चोरे (उपशहर प्रमुख) , संदिप दरेकर,मंगेश भुजबळ (उपतालुकाप्रमुख ), विक्रम ताजणे(विभागप्रमुख), शहाजी भंडारे,शहाजी पांडे,संतोष नरवडे,सुदर्शन वागदरे,अमोल पोकळे, सनी गावडे,विजय पंडीत,यश धनी ज्ञानेश राऊत,गणेश गिलबिले, विकास नरके, सुजीत विरोळे,आकाश सुर्वे, संतोष कांबळे , दादा भिसे, पप्पु खैरे,अमोल अडणे,अमित ढमढेरे, ज्ञानेश्वर शिंदे ,अभिषेक सुर्वे, आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. युवासेना तालुकाप्रमुख विजय लोखंडे यांनी आभार मानले.