लोणी काळभोर अनिकेत मुळीक
हडपसर परिसरातील *सुरक्षा नगरमध्ये* लागलेल्या आगीत १२ झोपड्या जळाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील वैदवाडी परिसरात सुरक्षानगरमध्ये झोपड्या आहे. पत्र्याच्या झोपड्यांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी दोन बंब आणि टँकर दाखल झाले. *जवान दत्तात्रय वाघ, सोमनाथ मोटे, संजय जाधव, विलास दडस, सत्यम चौखंडे, प्रदीप कोकरे* यांनी पाण्याचा मारा करुन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.