पिसे येथील वि,कार्यकारी सोसायटीचे संचालक तीन आपत्य असल्या कारणाने पद रद्द,

Bharari News
0
सासवड बापू मुळीक
       सासवड (ता पुरंदर ) येथील म्हस्कोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. पिसे, ता. पुरंदर, जि. पुणे या संस्थेच्या सन २०२१-२२ ते २०२६ २०२७ या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या संचालक मंडळ निवडणूकीमध्ये भानुदास बाळकृष्ण मुळीक यांनी संचालक पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेले होते      
 संचालक निवडणुकीमध्ये  भानुदास बाळकृष्ण मुळीक  हे संचालकपदी निवडून आलेले आहेत. आणि, ज्या अर्थ वाचले क्रं. २ अन्वये  योगेश मुगूट मुळीक, मु पो पिसे  यांनी या कार्यालयास दि २०२/०५/२०२२ रोजी सादर केलेल्या अर्जामध्ये  भानुदास बाळकृष्ण मुळीक यांना सन २००१ नंतर दोन पेक्षा जास्त अपत्ये झाल्याचे नमूद केलेले आहे व तसे पुरावे सादर केलेले आहेत,   
कार्यालयाचे संदर्भ क्रं.३ अन्वये नोटीस जारी करून  भानुदास बाळकृष्ण मुळीक, मु.पो. से, ता. पुरंदर, जि. पुणे यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३अ अन्वये कसूरदार असलेने संस्थेचे संचालक पदावरून का कमी करण्यात येवू नये याचा खुलासा करण्यासाठी दि. २६/०५/२०२२ रोजी या कार्यालयामध्ये कागदपत्रासह उपस्थित राहणेबाबत कळविण्यात आले होते. परंतु सदर दिवशी शासकिय कामकाजा निमीत्त पुणे येथे असलेने सुनावणीस पुढील दिनांक ०७/०६/२०२२ रोजी ठेवण्यात आली. आणि,
 पुढील सुनावणीस दिनांक ०७/०६/२०२२ रोजी जाब देणार व तक्रारदार दोघेही उपस्थित नसल्या कारणाने पुढील सुनावणी दिनांक ०५/०७/२०२२ रोजी ठेवण्यात आलो. त्याअर्थी, पुढील सुनावणी दिनांक ०५/०७/२०२२ रोजी जाय देणार.
       भानुदास बाळकृष्ण मुळीक यांचा अर्ज या कार्यालयास प्राप्त झाला असुन त्यात त्यांनी वैदकीय कारणास्तव दिनांक ०५/०७/२०२२ रोजीचे सुनावणीस मी उपस्थित राहू शकत नाही त्यामुळे मला बाजू मांडण्यासाठी पुढील तारीख देण्यात यावी अशी विनंती केलेली होती. त्यामुळे पुढील सुनावणी दिनांक ११/०७/२०२२ रोजी ठेवण्यात आली. आणि, दिनांक ११/०७/२०२२ रोजीचे सुनावणीस अर्जदार योगेश मुगुट मुळीक हे उपस्थित होते. जाब देणार  भानुदास बाळकृष्ण मुळीक हे अनुपस्थित राहून त्यांनी दरम्यानच्या कालावधीत कोणताही लेखी अथवा कागदपत्राचा खुलासा सादर केला नाही यावरुन त्यांना याबाबत काहीही म्हणावयाचे नसल्याचे निदर्शनास येते. आणि,
त्याअर्थि.  भानुदास बाळकृष्ण मुळीक, मु पो पिसे, हे म्हरकोचा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, पिसे, ता. पुरंदर जि.पुणे या संस्थेवर संचालकपदी निवडून आले असले तरी अर्जदार यांनी सादर केलेल्या रेशनिंग कार्ड व शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रत या कार्यालयास पुरावा म्हणून सादर केलेल्या असून श्री. भानुदास बाळकृष्ण मुळीक, मु पो पिसे, ता.पुरंदर जि पुणे येथील रहिवाशी असून त्यांना २००१ नंतर दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत, असे सदर पुराव्या वरुन दिसुन येते.
शिवसेनेचे माजी सरपंच गणेश मुळीक ,उद्योगपती रामदास बापू मुळीक  यांच्या माध्यमातून विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ निवडून आणण्यात यश आले.परंतु तीन आपत्य असल्यामुळे भानुदास बाळकृष्ण मुळीक याना दिलेले अध्यक्ष पद रद्द झाले आहे.आजून सोसायटीचे दोन संचालक रद्द होण्याच्या मार्गावर आहेत.आणि उपरोक्त नमुद विवेचनावरुन संस्थेचे संचालक भानुदास बाळकृष्ण मुळीक हे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६९ मधील नियम ५८ अन्वये तरतुदीनुसार अपात्रता धारण करत असल्याने ते महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कअ (१) (VII) अन्वये संस्थेच्या समिती सदस्यपदी राहण्यास अनर्ह ठरत असल्याची माझी खात्री झाली आहे. त्या मी खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!