रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
कारेगाव तालुका शिरूर येथील नाथाभाऊ हरिभाऊ शेवाळे यांची जनता दलाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली, बेंगलोर येथे एका छोटेखानी समारंभामध्ये भारताचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या हस्ते त्यांना हे निवडीचे पत्र देण्यात आले. पंचवीस वर्षाहून अधिक काळ पक्षाचे एकनिष्ठ काम केल्यामुळे ही जबाबदारी मिळाल्याचे शेवाळे यांनी सांगितले,
एचडी देवेगौडा यांचे निकटवर्ती म्हणून शेवाळे यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी पक्षाचे सरचिटणीस , युवा प्रदेशाध्यक्ष , कार्याध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. प्राध्यापक शरद पाटील यांनी नाथाभाऊ शेवाळे यांना पदाची सूत्रे हाती दिली. आगामी काळात पंचायत समिती , जिल्हा परिषद , नगर परिषद , नगरपालिका , महानगरपालिका या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून पक्षाची ताकद वाढवणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.