शिरूर विशेष प्रतिनिधी
टाकळी हाजी तालुका शिरूर येथील भिल्ल समाजातील लोकांना शासकीय दरबारी जातीच्या दाखला संदर्भात येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून माजी सरपंच दामूशेठ घोडे यांनी 101 दाखले स्वखर्चाने व सर्व कागदपत्रे स्वतः जमा करून काढून घेतले व त्यांचे वाटप केले. यामुळे या समाजातील लोकांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
फोटो ... भिल्ल समाजासाठी जातीचे दाखले वाटप करताना आदर्श सरपंच दामुशेठ घोडे व मान्यवर
फोटो ... भिल्ल समाजासाठी जातीचे दाखले वाटप करताना आदर्श सरपंच दामुशेठ घोडे व मान्यवर
यासाठी कागदपत्रे गोळा करण्यासाठी व शासकीय दरबारी पाठपुरावा करणे कामी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अशोक बापू पवार , अतुल बेनके,उपजिल्हाधिकारी संदीप निचित,शहाजी पवार यांची मदत घेण्यात आली असे घोडे यांनी सांगितले. शासनाच्या कार्यालयात इतके सारे कागदपत्र जमा करून पाठपुरावा करण्यासाठी आमच्याकडे अपुरे ज्ञान आहे. आमच्यासाठी केलेल्या उपक्रमांबाबत आम्ही भारावून गेलो असून या खुशीत आम्ही ढोल लेझीम खेळत आनंद उत्सव साजरा केला असल्याचे भिल्ल समाजाचे साहेबराव माळी व माजी ग्रामपंचायत सदस्या पारुबाई माळी यांनी सांगितले. गोरगरीब जनतेसाठी झटणारा कार्यकर्ता, सर्वसमावेशक, सर्वांच्या सुख-दुःखात अग्रभागी राहून समाजहित जपत असताना स्वतःच्या खिशाला झळ घेऊन गरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारा एक अवलिया दामूशेठ घोडे यांच्या रूपाने टाकळी हाजी मध्ये पंधरा वर्षांपासून अविरत परिश्रम करताना दिसून येत आहे. माजी सरपंच दामू शेठ घोडे यांनी घरकुला सोबत घरातील फरशी फर्निचर प्रत्येकाच्या घरात लाईट तसेच काही लोकांना किराणामाल सुध्धा भरून दिलेला आहे. बेट भागात आण्णा म्हणून ओळख निर्माण झाली असून त्यांनी प्रत्येकाच्या मनामनात जागा निर्माण केलेली आहे. अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अण्णांचा दाखला देत त्यांच्या दातृत्वाची प्रशंसा केलेली आहे.या भिल्ल समाजाला अण्णा म्हणजे आपल्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आणि म्हणूनच अण्णांना कोरोणा ची लागण झाली होती तेव्हा या समाजाने बाळुमामा देवस्थान कडे नवस बोलून अण्णांना लवकर बरे करा अशा प्रकारे प्रार्थना केली होती आणि म्हणूनच त्यांनी बाळूमामाचे मंदिर या वस्तीत उभारले आहे. एवढी श्रद्धा ही लोकं आण्णाप्रती बाळगत आहेत.
आपल्या वडिलांचे आजाराने निधन झाल्यानंतर गावाच्या हितासाठी स्वतः ॲम्बुलन्स उपलब्ध करून देऊन प्रत्येक रुग्णाच्या मदतीला धावून जाऊन प्रसंगी त्या रुग्णाचा खर्चही स्वतः केलेला आहे. टाकळी हाजी येथे भिल्ल समाजाचे बरेच कुटुंब राहत असून त्यांना समाजात आणण्यासाठी त्यांच्या समस्या सोडविण्यात नेहमीच अग्रेसर असल्याने त्यांचे फोटो अनेकांच्या दरवाजावर लागलेले दिसून येत आहेत. भिल्ल समाजासाठी घरकुल योजनेतून घरे मंजूर करताना लागणारे कागदपत्रे जमा करण्यापासून त्या लोकांना घराची पूजा करणेपर्यंत सर्व काम जबाबदारीने करून घेवून जी रक्कम कमी पडली ती स्वतः च्या खिशातून टाकून नवीन जीवनशैली उपलब्ध केल्यामुळे समाजातील लोकांमध्ये जागृती झाली असून तिथे जवळच असणाऱ्या शाळेत त्यांची मुले शिक्षण घेवू लागली आहेत .
अण्णांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना संजीवनी फाऊंडेशन कडून आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.