पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Bharari News
0
लोणी काळभोर अनिकेत मुळीक
     पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे सुनील नारायण शिंदे या कर्मचाऱ्यानी लोणी काळभोर (तालुका हवेली) येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील नारायण शिंदे हे शिवाजीनगर येथे हवालदार म्हणून नेमणुकीस होते. तर ते लोणी काळभोर येथील कवडी माळवाडी येथे राहण्यास होते. काल रात्री त्यांच्या खोलीत ते झोपण्यास गेले होते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळचे ११ वाजले तरी ते देखील ते बाहेर आले नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाने दरवाजा वाजविला. परंतु आतमधून कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद आला नाही. त्यानंतर त्याने बाजूच्या खिडकीतून पाहिल्यावर वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.त्यानंतर सुनील शिंदे यांना जवळील रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे लोणी काळभोर पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!