शिक्रापूर एन बी मुल्ला
बुरुंजवाडी (ता.शिरुर) येथील धोंडीभाऊ काशिनाथ सरोदे (वय ७७ वर्षे) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
शिरुर व शिक्रापूर पंचक्रोशी मधील अध्यात्मिक क्षेत्राचा वारसा आणि वसा जपणाऱ्या सरोदे परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व; ज्यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळात एक आदर्श व्रत कार्य करत आपल्या परिवारावर योग्य संस्कार केले. आपल्या जिद्द, कष्ट, मेहनत यांच्या जोरावर आदर्श कुटुंब व्यवस्था निर्माण करणारे आदर्श व्यक्तिमत्व अशी धोंडिभाऊ सरोदे तथा आण्णा यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कासारी येथील सौ. हिराबाई गो. गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अशोक सरोदे यांचे ते वडील होत.