लोणी काळभोर अनिकेत मुळीक
पोलिसांनी मंडळांना उत्सव शांततेत तसेच नियमांचे पालन करुन साजरा करण्याचे आवाहन केले. मंडळांसाठी तयार करण्यात आलेली नियमावली जाहीर करण्यात आली. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवर पोलिसांकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले.
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांना त्वरीत मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.चार दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धक मंडळांनी उत्सवाच्या कालावधीत ध्वनिवर्धकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमावलींचे पालन करणे गरजेचे आहे. ध्वनिवर्धकाचा आवाज मर्यादित असावा. उत्सवाच्या कालवधीत ४ सप्टेंबर (गौरी पूजन), ६ सप्टेंबर (सातवा दिवस), ८ सप्टेंबर (नववा दिवस) तसेच ९ सप्टेंबर रोजी अनंत चर्तुदशीच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीवर्धकास परवानगी देण्यात आली आहे.