सुनील भंडारे पाटील
एरव्ही अपवित्र म्हणून कातडी वस्तुंना मंदिरात मनाई असते, पण कातड्याची पाने पखवाजास असताना पखवाज्यास मात्र मानाने बोलवतात , असा विरोधाभास फक्त अध्यात्मात चालतो, असे मत इंदापुर येथे निळोबारायाच्या पालखी सोहळ्यात सरडे लॉन्स येथे उपस्थीत वारकरी भाविकांसमोर मांडले . तुकाराम महाराजाचे अभंगावर बोलताना त्यांनी जिवन सफल होण्यासाठी परमार्था शिवाय गत्यंतर नसलेचे सांगितले . भावीकांनी ' पुंडलीक वरदा हारी विठ्ठल ' व ' ज्ञानोबा तुकोबा निळोबा ' चा नामघोस करत भजनाचा आनंद घेतला . दिंडी प्रमुख अशोक सावंत यांनी उत्तम नियोजन केले . संत निळोबारायांचे वंशज गोपाळबुवा मकाशीर यांनी रथास जुंपलेल्या बैलांचे हिरडगाव पासूनचे खराब रस्त्यांमुळे अतोनात हाल झालेचे सांगीतले.