पुण्यात घडला घृणादस्पद प्रकार - सावत्र वडिलांनीच केला आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Bharari News
0

 लोणी काळभोर अनिकेत मुळीक

                नववीत शिकणाऱ्या मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या सावत्र वडिलांना २० वर्ष सक्तमजुरी आणि ६० हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी सुनावली. दंड न भरल्यास दोन वर्ष अतिरिक्त दोन वर्ष भोगावा लागेल, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
                पीडीत मुलीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तिच्या आईने आरोपीशी विवाह केला होता. पीडीत मुलगी नववीत शिक्षण घेत होती. २०१७ मध्ये सावत्र वडिलांनी तिला वेळोवेळी धमकावून तिच्यावर बलात्कार केला होता.याबाबत पीडीत मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार ३० वर्षीय सावत्र वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने सावत्र वडिलांना २० वर्ष सक्तमजुरी आणि ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील ॲड. प्रमोद बोंबटकर यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यात पीडीत मुलीची साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस नाईक अंकुश केंगले यांनी सहाय केले.

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!