शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
पुणे - नगर महामार्ग कचऱ्याच्या व घाणीच्या विळख्यात सापडला असून
ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
पुणे - नगर महामार्गाच्या कडेला असलेले कचऱ्याचे साम्राज्य.(छाया : नमीरा डिजीटल)
पुणे - नगर महामार्गाच्या कडेला असलेले कचऱ्याचे साम्राज्य.(छाया : नमीरा डिजीटल)
पुणे-नगर महामार्गालगत शिरूर ते कोरेगाव भीमा दरम्यान शिरूर,
कारेगाव, रांजणगाव गणपती, कोंढापुरी, शिक्रापूर, सणसवाडी व कारेगाव येथे
औद्योगिक क्षेत्र आहे. औद्योगिक क्षेत्रातील घन स्वरूपातील टाकाऊ पदार्थ व
कचरा मोठया प्रमाणात महामार्गाच्या कडेला टाकला जातो. घरगुती सुका व ओला
कचरा देखील रस्त्याच्या कडेला टाकला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात
प्रदूषण झाले आहे. तसेच काही ठिकाणी कचऱ्यामुळे व घाणीमुळे दुर्गंधी
सुटल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण
झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध टाकून कचरा टाकणाऱ्यावर
दंडात्मक कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.