रांजणगाव औद्योगिक वसाहती मधील कंपन्यांच्या वाहनांसाठी वाहनतळ उपलब्ध करुन द्यावा - संजय पाचंगे

Bharari News
0
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 
           महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ पुणे.यांनी  रांजणगाव औद्योगिक वसाहती मधील कंपन्यांच्या वाहनांसाठी वाहनतळ उपलब्ध करुन द्यावा अन्यथा दिनांक १७ आॅगस्ट २०२२ रोजी पी - ४८ हा हाॅटेल एस ईन शेजारील वाहनतळासाठी चा राखीव वाहनतळ सुरू करणेबाबत चे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा जिल्हा ऊद्योग आघाडीचे संजय पाचंगे यांनी दिला आहे.         
या बाबत संजय पाचंगे यांनी औद्योगिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी , पोलीस निरीक्षक रांजणगाव एम आय डी सी., उपविभागीय अधिकारी स्थापत्य /विद्युत यांत्रिकी एमआयडीसी रांजणगाव , तहसीलदार शिरुर. व  रांजणगाव इंडस्ट्रीयल असोसिएशन. रांजणगाव एमआयडीसी यांना निवेदने दिली आहेत. 
      या बाबत संजय पाचंगे यांनी दिलेल्या निवेदना नुसार रांजणगाव एमआयडीसी मधे मोठ्या प्रमाणात बहुराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्या सुरू आहेत. रांजणगाव एमआयडीसी मधे मोठ्या प्रमाणावर जड, अवजड वाहने , कामगार वाहतूक करणारी, वाहने ये जा करतात. परंतु या वाहनांना पार्किंग सुविधा उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागतात. रस्त्यावर वाहने उभी केल्यास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन कडुन दंडात्मक कारवाई करण्यात येते.रस्त्यावर वाहने उभी केल्याने अनेक अपघात घडलेले असुन मनुष्य जिवीत हानी झाली आहे. एमआयडीसी ने आपल्या आराखडय़ात वाहन पार्किंग तळ निच्छित केलेले होते. पण त्यातील काही वाहनतळ एमआयडीसी ने विकलेले असल्याची माहिती समोर आली असून नाममात्र दराने दिलेल्या वाहनतळासाठी पुन्हा व्यवसायीक दराने पैसे घेतले आहे . त्यामुळे वाहनतळ धारकांची पंचायत झाली आहे. त्यातील अनेक वाहनतळ वाहनधारकांना उपलब्ध नसल्याचे दिसून येते.यामुळे वाहनधारक व कंपन्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. याबाबत एमआयडीसी ला वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही.        
तरी आता दिनांक १७ आॅगस्ट २०२२ पर्यंत जर वाहनतळ उपलब्ध करून दिली नाही तर दिनांक १७ आॅगस्ट २०२२ रोजी एमआयडीसी ने वाहनतळासाठी राखीव ठेवलेला पी - ४८ या भूखंडावर भाजपा उद्योग आघाडी पूणे जिल्हा ग्रामीण च्या वतीने वाहनतळ सुरू करुन देण्यात येईल.
तसेच जर तेथे जागा कमी पडली तर एमआयडीसी कार्यालय रांजणगाव एमआयडीसी व एमआयडीसी चे जेथे भुखंड रिकामे असतील तेथे वाहनतळाचे फलक लावून वाहनतळ सुरू करण्यात येतील.त्यानंतर उद्भवणाऱ्या परीस्थितीस एमआयडीसी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असे ही पाचंगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!