सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
पिंपळनेर येथून राळेगळ सिद्धी बेलवंडी श्रीगोंदा मार्गे निघालेल्या निळोबारायांचे दिंडीचे १०व्या दिवशी आज टेंभुर्णी येथून पंढरपुरकडे ज्ञानोबा तुकारामचे नामघोषात प्रस्थान झाले . बलभिम वाघ व देविदास शिंदे या पडापाव ची गाडी चालवून प्रगती करणाऱ्या सामान्य व्यक्तीनी जेवन नाष्टा व्यवस्था केली होती .
दिंडीतील वाटकरी पहाटे ३ ते ६ पर्यंत स्नानसंध्या उरकून जनता विद्यालयात दिंडी मुक्कामातून पुढे सकाळी पंढरपूर कडे प्रस्थान झाले . रथास असणारी चिंचोली मोराची दिंडीचे बैलजोडीने लक्ष वेधले . परीते, करकंब, भोसे, गुरसाळे मार्गे शनीवारी दिंडी चंद्रभागेतीरी पोचेल .
२ वर्षं दिंडी सोहळा कोरोनामुळे बंद होता त्यामुळे यावेळी वारकरी संख्या वाढून भावीकांमध्ये मोठा उत्साह जाणवत होता . पखवाज वाटवणारा छोटा वारकरी लक्ष वेधत होता .कोरोना गेला वाटत असला तरी सावधनता बाळगुन काळजी घेण्याचे आवाहन दिंडी प्रमुख अशोक सावंत यांनी केले .