शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे (ता शिरूर )येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
लोकमान्य टिळक जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात अशोक दहिफळे व नितिश पवार यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रशालेची विद्यार्थिनी श्वेता लाड व अंजली जाधव यांनी लोकमान्य टिळक यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली, तसेच सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख शिवाजी आढाव यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे व प्रशालेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण व पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या,