शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली
विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण, पालक प्रतिनिधी महेंद्र सादगिले, भाऊसाहेब शेलार, किसन भुजबळ, यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात कृष्णा कदम, प्रज्ञा पासले, तन्मय घुले, प्रज्वल बोरुडे, ज्ञानेश रासकर, श्रीनाथ तोडकर या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांविषयी मनोगत व्यक्त केले. शिक्षक प्रतिनिधी मधून आदेश गारगोटे यांनी लोकमान्य टिळकांविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालन खेडकर यांनी केले.