आंबेगाव तालुक्यात अंगणवाडी दुरुस्तीची मागणी

Bharari News
0
प्रतिनिधी मिलिंद टेमकर
       अवसरी खुर्द (तालुका आंबेगाव) येथील अंगणवाडीच्या दुरावस्ती संदर्भात गावातील नागरिकांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष मेघश्याम भोर यांच्याकडे दुरुस्तीची मागणी केली,    
मेघश्याम भोर व त्याचे सहकारी   सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद खोलल्लंम, भाजपा शहर अध्यक्ष  स्वप्नील इंदोरे, भाजपा कार्याध्यक्ष ओमकार शिंदे यांनी अवसरी खुर्द येथील अंगणवाड्यांमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली असता असे आढळून आले की बहुतेक सर्व अंगणवाड्यांमध्ये वरचे पत्रे हे तुटलेल्या अवस्थेत आहेत तसेच अंगणवाडी दरवाजे मोडकळीस आलेले असून भर दिवसा अंगणवाडीमध्ये साप निघण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच अंगणवाड्यांमध्ये सध्या वीज कलेक्शन कट केल्यामुळे लाईटची सोय नाही असे आढळून आले आहे.
या अनुषंगाने आज भारतीय जनता पक्षाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष मा.डॉक्टर ताराचंद कराळे यांच्या नेतृत्वाखाली गट विकास अधिकारी जालिंदर पठारे  यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष मेघश्याम भोर यांनी अंगणवाडी दुरुस्ती संदर्भात निवेदन दिले .या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे संघटन सरचिटणीस संदीप  बाणखेले, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुशांत थोरात भाजप मंचर शहर अध्यक्ष गणेशजी बाणखेले, मंचर सरचिटणीस योगेश बोऱ्हाडे आदी उपस्थित होते,
 भोर यांनी दिलेल्या पत्राची  गटविकास अधिकारी जालिंदर  पठारे . यांनी तातडीने दखल घेऊन अवसरी खुर्द चे ग्राम विकास अधिकारी  जगन्नाथ शिदोरे व बालविकास  अधिकारी  प्रीतम बार भुवन  यांना सदर अंगणवाड्याची तातडीने पाहणी करून त्या अंगणवाड्यांचा अहवाल तयार करून सर्व अंगणवाड्यांच्या दुरुस्त्या करण्याचे आदेश दिले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!