शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
महाविद्यालयाच्या परिसरात संस्थेचे खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे व संस्थेचे कार्यालयीन अधिक्षक सिताराम अभंग यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयीन, कनिष्ठ महाविद्यालयीन व व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. योगेश पवार, डॉ. निता कांबळे, डॉ. एस.एस.राणे, डॉ.एम.एम.भोसले, डॉ. एस.पी.डाकले, डॉ. बागुल, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.संजय भोईटे, व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे विभाग प्रमुख प्रा.अरुण शिंदे, प्रा.सुरेश मोरे, प्रा.एन.बी.मुल्ला, प्रा.हेमंत सावंत, प्रा.अनिल दाहोत्रे, प्रा.ए.एन.मदने, प्रा.राधिका इप्पकायल, प्रा. प्रिया आरडे, प्रा.जी.एस.बडनौरु, प्रा.व्ही. ए.कदम, प्रा.मनीषा ठोंगिरे, कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे, डी. बी. बेसके, के.जी.गुढेकर आदी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम. जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने दिवसेंदिवस ओझोनचा थर कमी होऊन तापमान वाढ होत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी सांगितले,