आंबेगाव मिलिंद टेमकर
श्री दत्तगुरु शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हिरकणी विद्यालयात आंबेगाव येथे जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला,
या प्रसंगी कार्यक्रम चे अध्यक्ष श्री रमेश गावडे C A मुंबई प्रमुख पाहुणे श्री राज gilda श्री सौरभ आनंद जे पी मॉर्गन गट शिक्षण अधिकारी सविता माळी मॅडम मंचर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक होडगर संस्था अध्यक्ष संजय पिंपळे उपाध्यक्ष, भीमाशंकर सह साखर कारखाना उपाध्यक्ष माऊली गावडे सरपंच स्वरूपा गावडे ,संस्था सचिव प्रवीण गावडे सह सचिव लक्ष्मण पिंपळे व संचालक विजय गावडे व ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूचे कौतुक करताना म्हणाले या वयात पुस्तकी शिक्षणाबरोबर कौशल्य शिक्षण महत्वाचे आहे ,सध्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार 6 वी ते 12 पर्यंत कौशल्य विकास कार्यक्रम चा सहभाग झाला आहे ,अतिशय चांगली बाब आहे शाळेत राबवत असलेल्या विविध संस्थाच्या मदतीने अनेक उपक्रम स्तुत्य आहेत यावेळी सौरभ आनंद माळी मॅडम, होडगर यांनी मनोगत व्यक्त केले दुपारी करीअर मार्गदर्शन कार्यकम आयोजन करण्यात आले
या प्रसंगी डॉ समीर पठाण व समर्थ भारत च्या संपादिका बारवे मॅडम यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष मनोज तळेकर उपाध्यक्ष महाराष्ट राज्य पत्रकार महासंघ व सोबत मिलिंद टेमकर जन कल्याण व पर्यावरण सेवा संस्था पुणे जिल्हा अध्यक्ष प्राथमिक शाळा मुख्याध्यापक शशिकला चिकले मॅडम व अरविंद मोढवे सर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मेंगडे सर यांनी केले,