शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
करंदी येथील चासकमान कालव्यामध्ये अनोळखी मृतदेह तरंगत असल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत पोलीस पाटील वंदना महेश साबळे (रा.करंदी, ता.शिरूर, जि. पुणे) यांनी खबर दिली आहे.
शिक्रापूर पोलिस ठाण्यातुन व घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार येथील महेश साबळे यांना चासकमान कालव्यामध्ये अनोळखी मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील वंदना साबळे, पोलीस हवालदार सचिन मोरे हे घटनास्थळी आले. कोंडीबा साबळे, संभाजी पांगरकर, बाळासाहेब नपते, विशाल नपते, मोरेश्वर साकोरे, आप्पासाहेब वरपे, नागु माने यांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची ओळख पटली नसून अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील पुरुषाचा हा मृतदेह आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अजिनाथ शिंदे पुढील तपास करत आहेत.