शिनोली मिलिंद टेमकर
अवसरी खुर्द(ता.आंबेगाव) येथे मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे.पावसाळ्यात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठल्याने त्यावर डासांची वाढ होऊन डेंग्यू,मलेरिया यासारखे साथीचे आजार पसरत आहेत.
गावात खालची वेस या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत आहे,त्या ठिकाणी लहान मुले प्राथमिक शिक्षण घेत आहेत,परंतु त्या इमारतीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याने मोकाट कुत्री व सर्प यांचाही वावर वाढला आहे, शाळेतील मुलांच्या व नागरीकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे तसेच साथीचे आजारही सर्वत्र पसरत आहे.तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून घनकच-याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करून कच-याची विल्हेवाट लावावी आणि साथीच्या आजारांवर उपाययोजना म्हणून संपूर्ण गावामध्ये व मळ्यामध्ये औषधांची धुरळणी करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
याबाबतचे निवेदन उपसरपंच स्नेहल टेमकर यांना . भारतीय जनता पार्टीच्या अवसरी खुर्दच्या वतीने देण्यात आले.यावेळी भारतीय जनात पार्टी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष मेघश्याम उर्फ बंटी भोर, सोशल मीडिया पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद खोल्लम,शहर अध्यक्ष स्वप्निल इंदोरे,उपाध्यक्ष सुशांत शिंदे,कार्याध्यक्ष ओमकार शिंदे,ऋषिकेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.