इनामगाव परिसरातील घोडनदि बंधाऱ्याचे लोखंडी ढापे चोरी करणा-या आरोपीस मुद्देमालसह केले जेरबंद

Bharari News
0
गुनाट एकनाथ थोरात 
     इनामगाव (तालुका शिरूर) सोमवार ता 25 रोजी पहाटे ०३:१५ वा.चे सुमारास मौजे इनामगाव गावचे हद्दीत गांधले मळा येथील घोडनदिच्या बंधाऱ्या जवळुन रात्रगस्तीस असणारे अंमलदार पो.ना.खबाले यांना बंधा-याजवळ निर्जन ठिकाणी अज्ञात चोरटे बंधा-याचे ढापे टेम्पोमध्ये भरूर चोरून नेत असलेबाबत बातमीदारांकडुन माहिती प्राप्त झाल्याने
पो.ना.खबाले यांनी स्थानिक नागरिकांचे मदतीने सदर ढापे चोरी करणा-या अज्ञात ३ ते ४ चोरटयांचा घटनास्थळी जावुन  अटक  करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना पोलीसांची चाहुल लागल्याने अंधाराचा फायदा घेवुन आरोपी टेम्पो जागेवरच सोडुन काटवणामध्ये व आजुबाजुचे शेतामध्ये पळुन गेले.आरोपींनी चोरी करण्याकरिता आणलेला टेम्पो नं.एम.एच.१२ एच.डी. ३५९७ हा जागीच ताब्यात घेण्यात आला असुन सदर ठिकाणावरून १ ) ३,५५,३२० / - रु . किंमतीचे ५६ लोखंडी ढापे २ ) ३,५०,००० / - रु . किंमतीचा टेम्पो नं.एम.एच.१२ एच.डी.३५९७ ( गुन्हयात वापरलेले वाहन ) असा एकुण ७,५५,३२० / - रु . किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . सदर ठिकाणाहुन पळून गेलेल्या आरोपीतांना अटक करणे अत्यंत आवश्यक असल्याने व तात्काळ त्यांचा शोध घेणेकरिता पोलीस पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात करून गोपनिय व तांत्रिक माहितीच्या आधारे टेम्पो चालक  सुरेश पंढरीनाथ पवार रा . कासारवाडी , पुणे यास शिताफिने अटक केली आहे . अटक आरोपीचे मदतीने त्यास मदत करणारे त्याचे इतर साथीदारांचा स्थानिक गुन्हे शाखा , पुणे ग्रामीण यांचे मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न चालु आहे . सदरची कारवाई मा . पोलीस अधीक्षक .अभिनव देशमुख सोो , मा.अपर पोलीस अधिक्षक .मितेश गटटे सो , पुणे व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी . यशवंत गवारी सो , शिरूर यांचे मागदर्शना खाली मा.पोलीस निरीक्षक श्री.सुरेशकुमार राऊत  सोऻॆ , शिरूर पोलीस ठाणे , स.पो.नि संदिप यादव , पो.ना खबाले , पो.ना. जगताप , पो.कॉ. पिठले , संतोष साळुंखे यांनी केलेली असुन याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५३३ / २०२२ भा.दं.वि.क. ३७ ९ , ५११ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक / नाथसाहेब जगताप हे करीत आहेत .

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!