मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात शिक्षकांसाठी इलेक्ट्रिकल ऑडिट प्रशिक्षण

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
          पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात शिक्षकांसाठी इलेक्ट्रिकल ऑडिट प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.    
 पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध शाखांमधील व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे होते. यावेळी संस्थेच्या बांधकाम विभागाचे   याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी सांगितले की दिवसेंदिवस वाढत असलेली विजेची गरज पाहता पूर्ण क्षमतेने आवश्यक वीज पुरवठा करणे शासनाला शक्य होत नाही.
तसेच भरमसाठ वाढलेल्या  महावितरणच्या वीज बिलामुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे सौर उर्जेचा जास्तीत जास्त वापर होणे ही काळाची गरज आहे. सोलरच्या ऑन ग्रीड व ऑफ ग्रीड प्रकाराबाबतही प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी मार्गदर्शन केले.  इलेक्टिकल ऑडिट प्रशिक्षणात इलेक्टिक सप्लाय सिंगल फेज की थ्री फेज, मंजूर विद्युत भार, सुरक्षिततेच्या साधनांमध्ये आयसीडीपी, आयसीटीपी, डीपी, फ्यूज, एमसीबी, लोड डीबी, स्वीचेस योग्य क्षमतेचे व आवश्यक त्या प्रमाणात बसविण्यात आले आहेत की नाही, योग्य अर्थिंग व अर्थ रेझिस्टन्स तपासणे, फेज व्होल्टेज तपासणे, लोड बॅलन्सिंग, पॉवर फॅक्टर, फेज टू फेज रेझिस्टन्स, फेज टू न्यूट्रल रेझिस्टन्स, फेज टू अर्थ रेझिस्टन्स, अर्थ रेझिस्टन्स मोजणे, लायटिंग लोड, लायटिंग लोडसाठी सेफ्टी डिव्हाईस आदी विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी संस्थेच्या बांधकाम विभागाचे सईद मुलाणी, महाविद्यालयातील व्यवसाय अभ्यासक्रमाचे विभाग प्रमुख प्रा.अरुण शिंदे, अविराज इलेक्ट्रीकल्सचे अमोल आटपडकर, वैभव जाधव आदी उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरात प्रा.वसंत गाडेकर, प्रा.दिनेश काळे, प्रा.विलास भोसले, प्रा.सुरेश मोरे, प्रा.एन.बी.मुल्ला, प्रा.रविंद्र केदारी, प्रा.रमाकांत देशपांडे, प्रा.सोमनाथ येळवंडे, प्रा. शोभा मोहिते, प्रा.सुवर्णा यादव, प्रा.ज्योती कोहिनकर, प्रा.आशा गिरमे, प्रा.अनिता तारू, प्रा.राजेंद्र बोरुडे, प्रा.राजेंद्र शेतसंदे, प्रा.हेरंब केतकर, प्रा.अरुण मटाले, प्रा.तुषार परदेशी आदी शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले. शिबिर यशस्वी होण्यासाठी मामासाहेब मोहोळ महाविद्यालयातील व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख प्रा.अरुण शिंदे, प्रा.सुरेश मोरे, प्रा.एन.बी.मुल्ला, प्रा.हेमंतकुमार सावंत, प्रा.राधिका इप्पकायल, कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे, श्रीमती राधिका वीर, रमेश भिलारे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गाडेकर यांनी केले. प्रा.एन.बी.मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.विलास भोसले यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!