सासवड बापू मुळीक
सुमारे ३० वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असणारे अजितदादा पवार चार वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री व्हावे असे महाराष्ट्राच्या जनतेला वाटत आहे. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहता विरोधी पक्षनेते राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत.अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते मुख्यमंत्री होण्यास आमच्या सदिच्छा आहेत. अशी भावना पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केली.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कन्या प्रशाला सासवड (तालुका पुरंदर ) येथे अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरीब विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या समितीचे सचिव व राष्ट्रपती पुरस्कार विजेते अरुण सुळगेकर यांनी केले या कार्यक्रमास विध्यालयच्या मुख्यध्यापिका. उषा अरुण सुळगेकर,जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे उपाध्यक्ष बंडूकाका जगताप, सासवड शहराध्यक्ष राहुल गिरमे, महिला अध्यक्ष .नीता सुभागडे,जिल्हा संगटक सचिव .कुमुदिनी पांढरे, नगरसेविका .मंगलनानी म्हेत्रे, उपस्थित होते. आभार प्रवीण खैरनार यांनी मानले