ऊरुळी कांचन सचिन सुंबे
ऊरुळीकांचन तालुका हवेली येथील पदमश्री को ऑप क्रेडीट सोसायटीची १,२८,२६,३०४/- रुपयांची फसवणुक करणारे संस्थेचे व्हाईस चेअरमन व व्यवस्थापक यांचेविरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करुन केले. उरुळीकांचन येथील पदमश्री को ऑप क्रेडीट सोसायटीच्या सन २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षाचे वैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी मा. उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर यांनी फिर्यादी यशवंत भागुजी पोंदकुले, प्रमाणित लेखा परिक्षक, सहकारी संस्था मर्या यांची नेमणुक करण्यात आली होती.
लेखा परिक्षक पोंदकुले यांनी पदमश्री को ऑप क्रेडीट सोसायटी संस्थेची सन २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षाचे वैधानिक लेखापरिक्षण केले असता या संस्थेकडुन ठेवीदारांच्या रक्कमेतून ८३,२६,३०४/ रुपये एवढी रक्कम बँकेत भरलेली नसल्याचे दिसुन आले .त्यावेळी त्यांनी अधिक चौकशी करून कागदपत्रांची पाहणी केली असता सदर रक्कम या संस्थेचे व्हाईस चेअरमन संजय दिगंबर कांचन व व्यवस्थापक विकास मारुती लोंढे यांनी संगनमत करुन ही रक्कम रोख स्वरुपात काढली असल्याचे दिसुन आले.
संजय कांचन यांनी संस्थेचे इतर संचालक यांच्या अनुपस्थितीमध्ये मासिक बैठक घेवुन बैठकीचे प्रोसिंडीगमध्ये फक्त स्व:ताची स्वाक्षरी करुन संचालकास माहिती न देता ४५,००,०००/- रु रक्कमेची कर्ज प्रकरणे स्व:ताचे सहीने परस्पर मंजुर केले असल्याचे निष्पन्न झाल्याने लेखा परिक्षक यांनी त्यांचे परिक्षणाचे अहवालामध्ये नमुद करुन सदरचा अहवाल उप-निबंधक सहकारी संस्था पुणे शहर, जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग १ सहकारी संस्था पुणे यांचे कार्यालयात सादर केला असता या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने लेखा परिक्षण यशवंत पोंदकुले यांच्या फिर्यादीवरुन पदमश्री को ऑप क्रेडीट सोसायटीचे सन २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षाचे वैधानिक लेखापरिक्षणामध्ये संस्थेचे व्हाईस चेअरमन संजय दिगंबर कांचन व व्यवस्थापक विकास मारुती लोंढे यांनी संस्थेची एकुण १,२८,२६,३०४ रुपयांची फसवणुक केल्याने लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्हयाचा तपास राजेंन्द्र मोकाशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक किरण धायगुडे हे करत असुन गुन्हयातील आरोपी व्यवस्थापक विकास मारुती लोंढे रा. तुपेवस्ती, लोंढे चाळ, ऊरुळीकांचन, हवेली, पुणे यांस दि.०९/०७/२०२२ रोजी अटक करण्यात आली आहे .तर दुसऱ्या आरोपीचे काही महिन्यापुर्वी निधन झाले आहे. ही कामगिरी नामदेव चव्हाण , बजरंग देसाई,सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, राजेन्द्र मोकाशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस ठाणे ,सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलीस नाईक संतोष आंदुरे, पोलीस शिपाई किशोर कुलकर्णी यांच्या पथकाने केली आहे.