रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
रांजणगाव गणपती तालुका शिरूर येथील औद्योगिक वसाहतींमधील डॉंग कॉंग कंपनीमध्ये दहा लाखांच्या चोरी केल्या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी मुद्देमालासह एक जणास अटक केली असल्याचे पोलीसांनी सांगितले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२६ जून राञी ११.४५ ते २७ जून पहाटे ००.३० वाजेपर्यंत अज्ञात आरोपीने कंपनीच्या कंपाऊड वरुन चढून कंपनीत प्रवेश करुन कंपनीच्या टुल रुम मधील 10,00,000 /- किमतीचे मशिनचे पार्ट चोरुन नेले होते.
सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पथक रवाना झाल्यावर या पथकाने कंपनीत चोरी करणारा आरोपी रोशन अशोकराव मेश्राम रा. वर्धा व त्यास मदत करणारा आरोपी संजय रामकिशन तोतरे रा. रांजणगाव व हा चोरीचा माल बाळगणारे रुपेश देवानंद गुरुतकर व कैलास अंगत मुंडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडुन ८,०६, ९९९/- रु किमतीचा माल हस्तगत केला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी , पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे , पोलीस कर्मचारी दत्ताञय शिंदे , विलास आंबेकर , संतोष औटी , विजय शिंदे , उमेश कुतवळ , विजय सरजिने यांच्या पथकाने ही कारवाई केली.