लोणी काळभोर अनिकेत मुळीक
थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत १६ ते १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करून मृतदेह टाकल्याचे आढळून आले आहे. चिंतामणी हायस्कूलच्या समोरील कारखान्याच्या मोकळ्या जागेत महिला मृतदेह आढळून आला आहे. सदर मुलीची ओळख अद्यापही पटलेली नाही.चेहऱ्यावर दगडाने ठेचल्याच्या खुणा दिसून आल्या. शेजारी रक्ताने माखलेला दगड होता.यावरून दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर पोलीस चौकीच्या समोरील बाजूस यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत आज मंगळवारी दि.५/०७/२०२२ पहाटे काही नागरिकांना संबंधित मुलीचा मृतदेह आढळून आला मृतदेह पाहिल्यानंतर नागरिकांनी तातडीने ही बाब लोणी काळभोर पोलिसांना कळविली. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तसेच घटनास्थळी डॉग स्कॉड पथकही दाखल झाले.लोणी काळभोर, थेऊर पोलीस स्टेशनच्या वतीने समक्ष घटनास्थळी पंचनामा
करण्यात आला, मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचल्यामुळे ओळख पटली नाही, पंचनामे
नंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठवण्यात आला, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
** मृतदेहाचे वर्णन**
पंजाबी ड्रेस, काळी पॅन्ट, गुलाबी सलवार, गळ्यात मंगळसूत्र, पायात गुलाबी चप्पल, वर्ण मध्यम,