लोणी काळभोर अनिकेत मुळीक ग्रामपंचायत लोणी काळभोर (ता हवेली) उपसरपंच पदी भारती राजाराम काळभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच माधुरी राजेंद्र काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्यात आली. या सभेत भारती राजाराम काळभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.लोणी काळभोर ग्रामपंचायत ही अतिशय वेगाने होणाऱ्या कामाने म्हणून संपूर्ण तालुक्यात ओळखली जाते.
या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या १७ आहे. त्यामुळे उपसरपंच. या पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भारती राजाराम काळभोर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येणाऱी विकास कामे दलित व आदिवासी वस्तीतील प्रलंबित कामे, गावातील रस्ते, पाणी योजना, स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊन स्वच्छ लोणी व सुंदर लोणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस ज्येष्ठ नेते माधव दत्तात्रय काळभोर यांनी बोलून दाखविला आहे. डिजिटल ग्रामपंचायत वैद्यकीय सुविधा, व्यायाम शाळा, वाचनालय,आरोग्याचे प्रश्न, वाडी वस्ती वरील रस्ते आदी प्रश्नांना प्राधान्य देण्यात येणार आहे असे मत मा.उपसभापती यूगंधर मोहन काळभोर यांनी मांडले.उपसरपंच निवडा नंतर समर्थकांनी गुलालांची व फटाक्यांची आतिषबाजी आनंद साजरा केला.
गावातील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदीर देवाचे दर्शन घेतले
त्याप्रसंगी सत्कार करताना .माधवआण्णा काळभोर (मा.जि.प.सदस्य), पै.राहुल काळभोर (महाराष्ट्र केसरी), शिवदास काळभोर (अध्यक्ष हवेली ता.कॉं.पार्टी), सुभाष काळभोर (मा.चेअरमन साधना सह.बँक.लि.), सनी काळभोर (मा.उपसभापती पं.स.हवेली), आण्णासाहेब काळभोर (मा.उपसरपंच), , सुर्यकांत काळभोर , सुनंदा आप्पासो काळभोर (मा.उपसरपंच), राजेंद्र काळभोर (मा.उपसरपंच), अमित काळभोर (उपाध्यक्ष हवेली तालुका रा.कॉ.पार्टी), युवराज काळभोर (अध्यक्ष वन व्यवस्थापन समिती), पै महेश काळभोर (मालोबा केसरी), सरपंच .माधुरी राजेंद्र काळभोर, मा.सरपंच विद्यमान ग्रा.पं. सदस्य .राजाराम विठ्ठल काळभोर, मा.उपसरपंच संगीता सखाराम काळभोर, ग्रा.पं. सदस्य योगेशनाना काळभोर, नागेश काळभोर, भरत काळभोर, गणेश कांबळे, राहुल काळभोर, ग्रा.पं. सदस्या साविता गीताराम लांडगे, प्रियांका सचिन काळभोर, ललिता राजेंद्र काळभोर, ज्योती अमित काळभोर, रत्नाबाई राजाराम वाळके, तसेच गीताराम लांडगे, सागर काळभोर, सचिन काळभोर, आप्पासाहेब काळभोर, ग्रामविकास अधिकारी जे .एच. बोरावणे, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद, इतर मान्यवर आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
मान्यवरांनी नवनिर्वाचित उपसरपंच भारती राजाराम काळभोर चौधरी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.