सुनील भंडारे पाटील
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढू बुद्रुक (ता शिरूर) येथील अनेक वर्षांपासून कामकाज पाहणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी
महाराज स्मृती समिती, तसेच ग्रामस्थ यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे
मुख्यमंत्री माननीय एकनाथ संभाजीराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी
फडणवीस यांचे आभार मानण्यात आले, त्या संदर्भातील पत्र देखील स्मृती
समितीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे,
मुख्यमंत्री शिंदे यांनी अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठुरायाची आषाढी एकादशीला महापूजा केल्यानंतर औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी नगर झाल्याचे जाहीर केले, त्याचप्रमाणे महाक्षेत्र तुळजापूर जवळील उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण धाराशिव असे केल्याने मराठवाड्यामध्ये तसेच संपूर्ण राज्यामध्ये चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे, ही गौरवास्पद, व महाराष्ट्राच्या जनतेला अभिमानास्पद बाब आहे, अशा मजकुराचे पत्र देऊन राज्याचे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले असून, त्यांना छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी धर्म पंढरी वढू बुद्रुक येथे दर्शन घेण्यासाठी यावे अशी आग्रहाची विनंती केलेली आहे,

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ विकासासाठी राज्य
शासनाने 200 कोटी रुपये निधी दिला असून, विकास आराखडा देखील तयार करण्यात
आला आहे, या आराखड्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ यांचा विचार देखील जाणून
घ्यावा, तसेच काम लवकरात लवकर चालू करावे अशी मागणी धर्मवीर छत्रपती संभाजी
महाराज स्मृती समिती, वढू बुद्रुक ग्रामस्थांनी केली आहे,